करिअरनामा ऑनलाईन । अनेक वर्षापासून 10वी आणि 12वीच्या (NEET Latur Pattern) परीक्षेचा लातूर पॅटर्न राज्यभरात गाजतोय, त्याच्या जोडीला आता ‘NEET’चाही लातूर पॅटर्न चर्चेत आला आहे. लातूर या एकाच जिल्ह्यातून तब्बल दोन-अडीच हजार मुलं आता डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत. नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यामुळे नीटमध्येही आता ‘लातूर पॅटर्न’चा बोलबाला झाला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्व परीक्षांचा निकाल कोरोना काळानंतर काही प्रमाणात मंदावला होता. मात्र यावर्षी निकालाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. यावर्षी नीट परीक्षेत दोन हजार पेक्षा जास्त मुले ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील, तेवढ्या गुणांची त्यांनी कमाई केली आहे.
एकाच शहरातील हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्या कॉलेजमधून थोडी थोडकी नव्हे तर चक्क 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण घेत नीट परीक्षेत यश (NEET Latur Pattern) मिळवले आहे. एकूण 720 गुणांपैकी 700 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही चार इतकी आहे. तर 650 पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 55 पेक्षा अधिक आहे. 600 गुण घेणारे 223 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. या आकडेवारीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.
नीटच्या 6400 जागांसाठीचा निकाल हा मंगळवारी रात्री लागला आहे. त्यामध्ये एकट्या लातूर जिल्ह्यातून 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचं स्पष्ट आहे. या परीक्षेचा निकाल (NEET Latur Pattern) अद्याप अपडेट केला जात आहे. त्यामुळे या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकाच शहरातील या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने प्रवेश घेण्यासाठी पात्र होण्याचा विक्रम रचला आहे.
लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये 500 ते सातशे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 431 इतकी आहे.
1. 500 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 431
2. 550 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 260
3. 600 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 119
4. 650 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 35
5. 700 गुण पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या – 01
कोचिंग क्लासलाही भरघोस यश (NEET Latur Pattern)
राजर्षी शाहू महाविद्यालयातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळेल असा विश्वास सीईटी सेलचे संचालक दिलीप देशमुख यांनी व्यक्त केला आहे. कोविड काळानंतर लागलेला हा विक्रमी निकाल आहे. 2018 साली जे भरघोस यश मिळालं होतं त्यानंतरचा हा सर्वोत्कृष्ट निकाल आहे. एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचाच नव्हे तर लातूर मधील अनेक महाविद्यालय त्याचबरोबर (NEET Latur Pattern) इथल्या कोचिंग क्लासेस यांनाही यावर्षी भरघोस यश मिळालं आहे. लातूर पॅटर्नचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. यासाठी इथले प्रत्येक महाविद्यालय, इथले शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे क्लास स्टाफ यांनी जी मेहनत घेतली आहे त्या मेहनतीचे हे फळ आहे; असं मत दिलीप देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय आणि रिलायन्स लातूर पॅटर्न सारख्या महाविद्यालयाने घवघवीत यश मिळवलं आहे. तसेच लातूर शहरामधील (NEET Latur Pattern) खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यापासून येथे ठिकठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com