NEET Exam 2024 : भावी डॉक्टरांनो… NEET परीक्षेस अर्ज करण्याची मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी (NEET Exam 2024) अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेस (NEET) अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना दि. 16 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. यावर्षी दि. 5 मे रोजी ही परीक्षा होणार आहे.

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी (NEET Exam 2024) परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेस अर्ज करण्यासाठी 9 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव अद्यापही काही विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. काहींचे अर्ज अपुरे असल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्‍यानंतर एनटीएने (NTA) मुदतवाढ देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

14 जूनला जाहीर होणार निकाल (NEET Exam 2024)
देशस्‍तरावरील होणारी नीट ही प्रवेश परीक्षा दि. 5 मे रोजी होणार असून या परीक्षेचा निकाल दि. 14 जूनला जाहीर होणार आहे. मराठी भाषेसह देशातील एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा देता येते. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, शुल्‍क याबाबतची सविस्‍तर माहिती एनटीएच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com