करिअरनामा ऑनलाईन | नॅशनल एलिजिबिलिटी आणि एंट्रन्स परीक्षा 2022 शी संबंधित (NEET Exam 2022) हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने JEE Mains 2022 पुढे ढकलल्यापासून NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. ट्विटरवर काही हॅशटॅग्स ट्रेंड करत आहे. NEET परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळणार आहे म्हणून NEET 2022 परीक्षा पुढे ढकलण्यात यावी; अशी मागणी होत आहे. इतकंच नाही तर ‘ही परीक्षा पुढे ढकलावी, नाहीतर आयुष्यात भाजपला एकही मत देणार नाही’; अशी पोस्ट संतप्त विद्यार्थ्यांकडून व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा येत्या काही आठवड्यांत होणार आहे. भविष्यातील (NEET Exam 2022) डॉक्टर आणि NEET चे उमेदवार चिंताग्रस्त अवस्थेत आहेत कारण त्यांच्याकडे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ शिल्लक नाही. अभ्यास होणार नाही म्हणून ही परीक्षा पुढे ढकलावी; अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, CUET आणि JEE Main परीक्षा एकाच वेळी होत आहेत, ज्यामुळे परीक्षेची तयारी करणे कठीण होत आहे. ज्यांना NEET 2021 च्या समुपदेशनात यश मिळू शकले (NEET Exam 2022) नाही त्यांचे म्हणणे आहे की समुपदेशन उशिरा उशिरा संपल्यामुळे अभ्यासासाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलावी; हि मागणी जोर धरत आहे.
भाजपचा धिक्कार करणारे हॅशटॅग होताहेत ट्रेंड (NEET Exam 2022)
विद्यार्थ्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. NEET 2022 च्या इच्छुकांनी आता #RemoveDharmendraPradhan या हॅशटॅगसह ट्विटरवर प्रवेश केला आहे. तसंच .#MODIJIextendNEETUG , #postponeneetug2022 हे हॅशटॅग्सही ट्रेंड होतात आहेत.
https://twitter.com/abhitiwari92720/status/1541627714972418048?s=20&t=QhmV16pIrgXOnVCPT0zyGQ
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com