करिअरनामा ऑनलाईन । दहावीचा निकाल जाहीर होऊन काही दिवस (NDA Career) झाले आहेत. तुम्ही जर NDA ची तयारी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भोसला मिलिटरी कॉलेज मध्ये NDA पूर्व तयारीच्या बॅचची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या बॅचला प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छित असाल तर, महाविद्यालयीन अभ्यासासोबतच तुम्ही NDA ची देखील तयारी करू शकता. ११ वी आणि १२ वी अशी दोन वर्षे तुमची तयारी करून घेतली जाईल.
अशी असेल फी आणि विद्यार्थी संख्या (NDA Career)
- NDA प्रिप्रेशन बॅचची एका वर्षाची फी 1 लाख 95 हजार रुपये आहे.
- यात तुमची प्रवेश फी आणि होस्टेलच्या फीचा समावेश आहे.
- या फीमध्ये तुम्हाला वर्षभरात लागणाऱ्या सर्व वस्तू कॉलेजकडून दिल्या जातील.
- कोर्ससाठी रिझर्व्हेशन नाही. सर्व प्रवेश हे ओपनमध्ये केले जातात.
- 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता
NDA प्रिप्रेशन बॅचमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही दहावी किती गुणांनी (NDA Career) उत्तीर्ण झाले आहेत हे महत्वाचे नसते. भोसला मिलिटरी कॉलेजकडून एक प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील मार्कच्या आधारावर प्रवेश निश्चित केला जातो.
विद्यार्थ्यांची शारीरिक आणि वैद्यकीय पडताळणी
1 ) प्रवेश परीक्षेत विद्यार्थाला सर्व विषयांचे ज्ञान आहे का, त्याची पडताळणी होते.
2) मुलाखतीमध्ये विद्यार्थी बोलतो कसा? स्पष्ट बोलतो का? त्याची NDA मध्ये जाण्याची खरंच इच्छा आहे का? या गोष्टी तपासल्या जातात.
3) शारीरिक चाचणीत विद्यार्थी शारीरिकदृष्टया सक्षम आहे का? विद्यार्थ्यांमध्ये काही व्यंग नाही ना; म्हणजे सैन्य (NDA Career) भरतीत होणाऱ्या शारीरिक चाचणीसारखीच पूर्ण पडताळणी केली जाते. हे सर्व झाल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्या विद्यार्थ्यांना एक तारीख देऊन भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये जॉईन होण्यास सांगितले जाते.
अशी आहे प्रवेश प्रक्रिया (NDA Career)
भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी सुरवातीला bmc.bhonsala.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून मेरिट फॉर्म भरा.
त्यानंतर प्रवेश परीक्षेसाठी कॉलेजकडून तुम्हाला संपर्क केला जाईल.
चौकशीसाठी विक्रांत कावळे मेजर मोबाईल क्रमांक 9890901079 आणि राम कुमार नायक कर्नल मोबाईल क्रमांक 9423163648 यावर संपर्क साधू शकता.
- अधिक माहितीसाठी पत्ता – डॉ. मुंजे मार्ग, रामभूमी समर्थ नगर, मॉडेल कॉलनी नाशिक येथे भेट देवू शकतात.
कशी आहे राहण्याची व्यवस्था
विद्यार्थी कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याला सर्व वस्तू पुरवल्या जातात. त्याला (NDA Career) कॉलेजमध्ये लागणारे साहित्य बाहेरून घ्यावे लागणार नाही. आपण भरलेल्या शुल्कात या सर्व गोष्टींचा समावेश असेल.
असा असेल विद्यार्थ्यांचा दिनक्रम
- सकाळी 6 ते 7.30 पर्यंत मिलिटरी ट्रेनिंग होईल. यामध्ये हॉर्स रायडिंग, स्विमिंग, फायरिंग, योगा, कराटे, मलखांब असे वेगवेगळे विषय शिकवले जातात.
- या प्रत्येक विषयाचे वेगवेगळे मार्गदर्शक असतात.
- मिलिटरी ट्रेनिंग झाल्यानंतर विद्यार्थी ब्रेकफास्ट करण्यास जातात. (NDA Career)
- नंतर कॉलेजची तयारी करून सर्व विद्यार्थी होस्टेलमधून कॉलेजमध्ये जातात.
- लगेच NDA चे क्लास सुरू होतात.
- ते झाल्यानंतर जेवण करण्यास वेळ दिला जातो.
- जेवण झाल्यानंतर विद्यार्थी पुन्हा आपल्या महाविद्यालयीन अभ्यासासाठी कॉलेजमध्ये येतात.
- पुन्हा रेग्युलर क्लास करून, चहा, नाश्ता करण्यासाठी वेळ दिला जातो.
- नंतर सायंकाळच्या वेळी स्पोर्ट्स खेळण्यास वेळ दिला जातो; असा एकंदरीत विद्यार्थ्यांचा दिनक्रम असतो.
हे अधिकारी करतात मार्गदर्शन
होस्टेलमधील विद्यार्थ्यांना शिस्त लागण्यासाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये रिटायर्ड सैनिकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा सैन्यात जाण्याचा आत्मविश्वास (NDA Career) वाढवण्यासाठी भोसला मिलिटरी कॉलेजचे जे माजी विद्यार्थी सैन्यात अधिकारी पदावर आहेत. त्यांचंही मार्गदर्शन दिलं जात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com