NCERT : सर्व शालेय पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार; INDIA नाही आता भारतच; NCERT चा मोठा निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पॅनेलने (NCERT) महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता NCERTच्या पुस्तकांमध्ये नवा ऐतिहासिक बदल होणार आहे. या बदलानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी (India) भारत (Bharat) हा शब्द शिकवला जाणार आहे. एनसीईआरटीच्या पॅनलने सर्व एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये India हे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने संमत केला आहे. देशातील विरोधी आघाडीने त्यांचे नाव बदलून I.N.D.I.A. ठेवल्यानंतर यावरुन जोरदार चर्चा होत होती. आता अशातच एनसीईआरटीने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये INDIA (India) या शब्दाऐवजी भारत हा शब्द सर्वत्र वापरला जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव एनसीईआरटीच्या पॅनेलसमोर मांडण्यात आला आणि तो एकमताने स्वीकारण्यात आला.

नव्या पुस्तकांमध्ये दिसेल बदल (NCERT)
हा बदल एनसीईआरटी पुस्तकांच्या पुढील संचामध्ये दिसून येईल. सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी  हा प्रस्ताव  ठेवण्यात आला होता. पण आता त्याला औपचारिक पाठिंबा मिळाला आहे. NCERT नं पुस्तक निर्मितीसाठी 19 सदस्यांची समिती नेमली होती. NCERT च्या पुस्तकात इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात यावा, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. आता NCERT ची नवी पुस्तके छापली जातील तेव्हा या पुस्तकांमध्ये इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत हा शब्द वापरण्यात येणार आहे. त्यासोबतच प्राचीन इतिहास (Asian History) या शब्दाच्या ऐवजी शास्त्रीय इतिहास (Classic History) हा शब्द वापरण्यात येणार आहे. आता NCERT च्या या निर्णयानंतर भारतातील इतर बोर्ड देखील हा निर्णय घेतील का? हे आता पहावं लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com