करिअरनामा ऑनलाईन । एनसीईआरटीच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात (NCERT Syllabus) बदल होणार असून नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे आता NCERTच्या सर्व पुस्तकांमध्येही बदल होणार आहे. पुढील शैक्षणिक धोरणांपासून म्हणजे 2024-25 पासून हा अभ्यासक्रम लागू केली जाणार असल्याची माहिती आहे.
NCERT textbooks for all grades to be revised in accordance with National Curriculum Framework: Education Ministry officials
— Press Trust of India (@PTI_News) March 27, 2023
शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन पाठ्यपुस्तके 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून लागू केली जाण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार या (NCERT Syllabus) अभ्यासक्रमात बदल केला जाणार असून त्यावर या आधीपासूनच काम सुरू करण्यात आलं आहे. कोरोना काळात डिजिटल शिक्षणाचं महत्व समोर आलं. त्याच आधारावर सर्व नवीन पाठ्यपुस्तके एकाच वेळी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जातील जेणेकरून कोणीही त्यांना डाउनलोड करू शकेल. तसेच पाठ्यपुस्तके नियमितपणे अद्ययावत केली जातील, त्यासाठी एक इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क विकसित केलं जाणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com