Nagar Vikas Vibhag Recruitment 2024 : राज्याच्या नगर विकास विभाग अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत (Nagar Vikas Vibhag Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट पदांच्या एकूण 77 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

संस्था – नगर विकास विभाग, मुंबई
भरली जाणारी पदे – अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, भुकरमापक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, पार्क अधीक्षक, पार्क असिस्टंट
पद संख्या – 77 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मादम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-३२ (Nagar Vikas Vibhag Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
अतिरिक्त जिल्हाधिकारी02
उपजिल्हाधिकारी04
तहसीलदार07
सह कार्यकारी अधिकारी02
नियंत्रक01
कार्यकारी अभियंता07
सहायक अभियंता15
उपअधीक्षक/भूमी अभिलेख01
कक्ष अधिकारी02
सहायक अभियंता24
लेखाधिकारी04
वृक्ष अधिकारी01
भुकरमापक01
सर्वेक्षक01
लिपिक-टंकलेखक03
पार्क अधीक्षक01
पार्क असिस्टंट01

असा करा अर्ज – (Nagar Vikas Vibhag Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://urban.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com