करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना इच्छा आहे त्यांना (Mumbai University) आता मुंबई विद्यापीठातून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यास करता येणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठ ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजच्या सहकार्याने अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑक्सफर्ड सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे; असं विद्यापीठाने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे जारी केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा कोर्स डिप्लोमा आणि सर्टिफिकेट स्तरावर घेतला जाईल. या अंतर्गत अभ्यास ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो.
हिंदू तत्त्वज्ञानाच्या अभ्यासावर भर दिला जाणार (Mumbai University)
विद्यापीठाचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांची आवड आणि रोजगाराच्या संधींवर अवलंबून, विद्यापीठ नंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा एमबीए स्तरावर देखील अभ्यासक्रम सुरु करु शकते. या अभ्यासक्रमांतर्गत हिंदू तत्त्वज्ञानाच्या अभ्यासावर भर दिला जाणार आहे.
‘ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टीडीज’ हे हिंदू धर्माशी संबंधित अभ्यासासाठी जगातील आघाडीच्या संशोधन केंद्रांपैकी एक मानले जाते. येथे, हिंदू धर्माशी संबंधित व्याख्याने ऑनलाइन मोडमध्ये देखील विनामूल्य ऐकता येतात. तर मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठ आहे. सध्या विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये 5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com