MSRTC Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी ST महामंडळात नोकरीची संधी; त्वरीत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक (MSRTC Recruitment 2024) अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक
भरले जाणारे पद – समुपदेशक
पद संख्या – 04 पदे (MSRTC Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक ४२२००१.

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
समुपदेशक मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology)

असा करा अर्ज – (MSRTC Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. उमेदवारांनी सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com