करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभाग अंतर्गत (MSRTC Recruitment 2022) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार अभियांत्रिकी पदवीधर, यांत्रिक मोटार गाडी, वीजतंत्री, पत्रे कारागीर, डीझेल मेकॅनिक, सांधाता पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.
विभाग – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड
भरली जाणारी पदे – शिकाऊ उमेदवार
अभियांत्रिकी पदवीधर
यांत्रिक मोटार गाडी
वीजतंत्री
पत्रे कारागीर
डीझेल मेकॅनिक
सांधाता
पद संख्या – 49 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी करण्याचे ठिकाण – रायगड विभाग
अर्ज फी – (MSRTC Recruitment 2022)
सर्वसाधारण प्रवर्ग – रु. 590/-
मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 295/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभाग: पेन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2022
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- अभियांत्रिकी पदवीधर – अभियांत्रिकी बी.ई.मेकॅनिकल/ ऑटो इंजिनिअरींग परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
- यांत्रिक मोटार गाडी – अभियांत्रिक पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर व्यवसायातील पदवीकाधारक (Diploma) उमेदवारांचा विचार करण्यांत येईल.
- वीजतंत्री – एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय कडील मोटार मेकॅनिक 2 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक
- पत्रे कारागीर – एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय विजतंत्री 2 वर्षाचा कोर्स | उत्तीर्ण असणे आवश्यक. (MSRTC Recruitment 2022)
- डीझेल मेकनिक – 1 वी/एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय शिटमेटल हा 1 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
- सांधाता – एस.एस.सी.उत्तीर्ण, आयटीआय डिझेल मेकॅनिक 1 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.. 1 वी पास व आयटीआय कडील वेल्डर (गॅस व इले.) हा 1 वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
मिळणारे वेतन –
अभियांत्रिकी पदवीधर – Rs. 4984/- Rs. 3542/- दरमहा
यांत्रिक मोटार गाडी – Rs. 9535/- दरमहा
वीजतंत्री – Rs. 9535/- दरमहा
पत्रे कारागीर – Rs. 8476/- दरमहा
डीझेल मेकनिक – Rs. 8476/- दरमहा
सांधाता – Rs. 8476/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र
जन्मतारखेकरिता शाळा सोडल्याचा दाखला
जातीचे प्रमाणपत्र
शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात.
असा करा अर्ज –
- ज्या उमेदवारांनी online registration व या आस्थापनेकरीता online Apply केले आहे, त्या उमेदवारास या कार्यालयातील शिकाऊ उमेदवारीकरीता विहीत नमुन्यातील छापील अर्ज प्राप्त करण्याकरिता दि. 26.09.2022 ते 08.10.2022 या कालावधीत (रविवार व सुटटीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते १६.०० (शनिवार १३.०० वाजेपर्यत) या वेळेत विभागीय कार्यालय, म.रा.मा.प.महामंडळ, रामवाडी, ता.पेण, जि.रायगड येथे रजिस्ट्रेशन व प्रोफाईच्या झेरॉक्स प्रतीसह संपर्क (MSRTC Recruitment 2022) साधण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
- अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी 16.00 वाजेपर्यंत राहील.
- त्यानंतर आलेल्या अर्जाचा कुठल्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
- अर्जदाराने अर्जासोबत फोटो, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, जन्मतारखेचा दाखला (टी.सी./बोनाफाईड) तसेच मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला इत्यादीची साक्षांकित प्रत जोडावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर CLICK करा (पदानुसार) –
अर्ज करा (BE/Diploma In Mechanical Engineering) – https://bit.ly/3BnXWZl
अर्ज करा (Mechanic Motor Vehicle) – https://bit.ly/3LV8qW1
अर्ज करा (Electrician) – https://bit.ly/3dVoN8x
अर्ज करा (Sheet Metal Worker) – https://bit.ly/3E827fO
अर्ज करा (Mechanic Diesel) – https://bit.ly/3Rm0WMQ
अर्ज करा (Welder Gas & Electric) – https://bit.ly/3RrxnJR
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com