करिअरनामा ऑनलाईन। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस निश्चितपणे यशाला (MPSC Success Story) गवसणी घालू शकतो. भरमसाठ फी भरून कोचिंग क्लास न लावता सेल्फ स्टडीवर आपण MPSC ची पोस्ट काढू शकतो हे दाखवून दिलंय बीडच्या शेतकरी कन्येनं. केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर ती पोलीस उप निरीक्षक पदापर्यंत पोह्चलीय. विशेष म्हणजे एनटीसीमधून ही शेतकरी कन्या, मुलींमध्ये राज्यातून प्रथम आली आहे.जाणून घेऊया एका जिद्दीचा प्रवास….
अश्विनीविषयी थोडक्यात…
शेतकरी बाळासाहेब धापसे यांची अश्विनी हि कन्या. बीडमधील धारूर तालुक्यातील अंजनडोह हे त्यांचं गाव. तिचे वडील शेती करतात. त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. तरी शिकून अधिकारी होण्याची जिद्द अश्विनीने मनाशी बाळगली आणि पूर्ण ही केली. MPSC ची परीक्षा द्यायचं म्हणलं कि अनेक उमेदवार कोचिंग क्लास लावण्यासाठी शोधाशोध सुरु करतात. पण अश्विनीने तसे केले नाही. कोणतेही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर भर देऊन तिने MPSC ची परीक्षा दिली आणि त्यामध्ये तिने चमकदार कामगिरी केली.
पहिल्या नंबरने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण (MPSC Success Story)
बिकट परिस्थितीवर मात करून स्पर्धा परीक्षेसाठी खडतर परिश्रम घेतलेल्या अश्विनीचे आता पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या यादीत एनटीसी गटात मुलींमधून अश्विनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आज ती पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.
केवळ दोन गुणांनी संधी गेली
अश्विनीचे 1ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण तिच्या अंजनडोह गावात असलेल्या नुतन माध्यमिक विद्यालयात झाले. 10 वी च्या परीक्षेत तिला 88 टक्के गुण मिळाले. या मेरीटवर तिला (MPSC Success Story) औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अश्विनीने तीन वर्षे औरंगाबादमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापिठात अभियांत्रीकीचे शिक्षण पूर्ण केले. 2017 पासून तीने MPSC च्या परिक्षेची तयारी सुरु केली. एक वर्षाच्या अभ्यासानंतर 2018 मध्ये तिने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा दिली होती. या परीक्षेत दोन गुणांनी तिची संधी गेली. मात्र निकाल पाहून खचून न जात अश्विनीने पुन्हा अभ्यास सुरु केला. 2019 मध्ये आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या यादीत एनटीसी गटात मुलींमधून अश्विनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
भावाचा मोठा वाटा
अश्विनीच्या या प्रवासात तिच्या कुटुंबीयांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिले. ती तिच्या यशाचे श्रेय तिच्या भावाला देते. अश्विनीच्या घरची परिस्थिती तशी हलाखीची. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी अश्विनीचा मोठा भाऊ योगीनंद धापसे खासगी कंपनीत नोकरी करत होता. कुटुंबाचा खर्च चालवण्याबरोबर तो अश्विनीला अभ्यासाचे साहित्य खरेदी करून द्यायचा. भावाच्या सहकार्यामुळे अश्विनीला आर्थिक मदत मिळत होती; त्यामुळे ती बिनधास्तपणे अभ्यास करू शकली. तिला मिळालेल्या यशात ती भावाचा मोठा वाटा असल्याचे सांगते.
हलाखीच्या परिस्थितीत मुलांना शिकवलं
अश्विनीची घरची परिस्थिती (MPSC Success Story) हालाखीची आहे. तिचे वडील बालासाहेब धापसे यांना अवघी पाच एकर शेती आहे ती सुद्धा कोरडवाहू. घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी मेंढ्या पालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. दोन मुले व मुलींचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कधीही आर्थिक झळ मुलांपर्यंत पोहचू दिली नाही. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे अश्विनी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊ शकली.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com