करिअरनामा ऑनलाईन । दहावी झाल्यानंतर सायन्सला प्रवेश… 12 वी सायन्स करत CET चा अभ्यास… CET मध्ये (MPSC Success Story) चांगले गुण मिळवत मेकॅनिकल इंजिनियरिंगला प्रवेश… इंजिनियरिंगच्या सर्व वर्षात कॉलेजमध्ये टॉपर… कॅम्पस इंटरव्ह्यू मधून पुण्याच्या नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी… अधीकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देईना… मग रिस्क घेऊन नोकरी सोडली… आणि आज आहे Deputy Collector…!! होय… हे सत्य आहे… हि कहाणी आहे एका ध्येयवेड्या तरुणाची. ज्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलंय. त मग जाणून घेऊया MPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेल्या प्रसाद चौगुले यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी…
प्रसाद विषयी थोडक्यात…
प्रसाद चौगुले हा सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी. प्रसाद च्या वडिलांचे ITI चे शिक्षण झाले आहे तर आई जेमतेम 7वी पर्यंत शिकली आहे. प्रसादला दोन बहिणी आहेतआहेत त्या दोघी इंजिनिअर आहेत. (MPSC Success Story) प्रसादचे 5 वी पर्यंतचे शिक्षण हे कराड येथे झाले. त्यानंतर 6 वी पासूनचे पुढचे शिक्षण ‘जवाहर नवोदय विद्यालय’ येथे झाले. ही केंद्र सरकारची निवासी शाळा आहे. प्रसाद आई – वडिलाना एकच मुलगा असल्यामुळे त्याला इतर् खाजगी शाळेमध्ये टाका, असा नतेवाईकांचा आग्रह होता. परंतु प्रसादच्या आई-वडिलांनी त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून स्वतः पासून दूर करून नवोदय विद्यालयात प्रवेश करून दिला. त्यामुळेच त्यांना संघर्ष म्हणजे नेमकं काय हे अगदी कमी वयात कळाले. अभ्यासात पहिल्यापासून गोडी असणाऱ्या प्रसादला पुस्तक वाचण्याचीही आवड होती.
कॅम्पस इंटरव्ह्यू मधून लगेच मिळाली नोकरी –
प्रसादाची दहावी झाल्यानंतर त्याने पुन्हा 11 वी आणि 12 वी साठी सायन्सला प्रवेश घेतला आणि CET चा अभ्यास केला. CET मध्ये चांगले गुण असल्यामुळे 2013 ला त्याला कराडच्या गव्हर्मेंट इंजिनियरिंगला मेकॅनिकल ब्रँच ला ऍडमिशन मिळाले. प्रसाद कॉलेजच्या सर्व वर्षांमध्ये टॉपर राहिला. कॉलेजमध्ये असताना कॅम्पस इंटरव्ह्यू मधून एका नामांकित कंपनीत त्याची निवड झाली. नोकरीमुळे आपल्याला आयुष्यात स्थिरता मिळेल या हेतूने प्रसादने नोकरीचा स्वीकार केला. यात त्याला घरच्यांनीही साथ दिली.
MPSC परीक्षा देण्याचं कसं ठरवलं –
ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर जेव्हा जॉब सुरू झाला, तेव्हा मात्र त्यांना कुठेतरी असं वाटू लागलं की, आपण यापेक्षा काहीतरी वेगळं करायला हवं. त्यांना दररोज 3 तास प्रवास करून कंपनीमध्ये जॉब करावा लागत होता. कंपनीत असताना तो बर्याचदा त्याच्या मित्रांच्या रुमवर जायचा. त्यांचे बरेच मित्र आधीपासूनच MPSC ची तयारी करत होते. म्हणून अधून मधून प्रसाद त्यांची पुस्तक वाचायचा. पुस्तक वाचताना त्याला वाटू लागले की आपण देखील हे करू शकतो. या अभ्यासात आपल्याला देखील आवड आहे. मग इथूनच त्याने MPSC ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
रिस्क घेतली आणि नोकरी सोडली –
प्रसाद आधीपासून एका कंपनीसाठी काम करत होता. (MPSC Success Story) नियमाप्रमाणे त्याने 2 वर्षाचा बॉन्ड केला होता. आत्ताशी नोकरी लागून 1 वर्ष पूर्ण झाले होते. बॉण्ड रद्द करून नोकरी सोडली आणि परीक्षेत अपयश आले तर पुढे काय? असे प्रश्न सतत मनामध्ये घोळू लागले. हे विचारचक्र सुरु असताना त्याने MPSC subordinate services combined group B परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. त्यामुळेच त्याला असं वाटू लागलं की, आपण काहीही अभ्यास न करता जर ही परीक्षा पास होऊ शकतो, तर आपण पूर्णवेळ अभ्यास केल्यानंतर नक्कीच राज्यसेवा परीक्षा पास होऊ. त्यामुळे त्याने मोठी रिस्क घेऊन जॉब सोडला.
अचानक संकट कोसळले –
जॉब सोडल्यानंतर त्याने मित्रांसोबत पुण्यामध्ये अभ्यास सुरू केला. परंतु अभ्यास सुरू केल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी एक गोष्ट घडली. त्यांच्या वडिलांना पॅरॅलिसिस चा अटॅक आला. त्यांना पाच दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आणि या वेळेमध्ये प्रसाद वडीलांसोबत होता. या गोष्टींमुळे मनात विचारांचं वादळ सुरू होऊन आपण जॉब सोडून चुकीचा निर्णय घेतला आहे का अशी त्याला शंका आली. पण प्रसादने ठरवलं होतं कि आता मागे हटायचं नाही. MPSC पास होऊन आपण घेतलेला निर्णय योग्यच ठरवायचा. त्यादृष्टीने प्रसादचे जोरदार प्रयत्न सुरु होते.
पहिल्याच प्रयत्नात मिशन पूर्ण –
राज्यसेवेची पूर्व परीक्षा दिल्यानंतर निकाल हाती आला. यामध्ये प्रसादने उत्तम मार्क मिळवले होते. (MPSC Success Story) निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून त्याने मुख्य परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. परीक्षेच्या आधी दोन महिने प्रसादने झालेल्या अभ्यासाची उजळणी करण्यावर भर दिला. त्याच्या मते स्पर्धा परीक्षेमध्ये उजळणी करण्यावर जास्त भर देणे गरजेचं आहे. परीक्षा झाल्यांनंतर प्रसादने Mock Interview चा सराव केला.
एक दिवस प्रसादला त्याच्या मित्राचा फोन आला आणि प्रसाद राज्य सेवा परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आल्याची बातमी त्यानेच दिली. पहिल्याच प्रयत्नात 588 मार्क मिळवत राज्यात पहिला येण्याचा मान प्रसादने पटकावला होता.
MPSC करणाऱ्यांसाठी प्रसाद काय सांगतो… (MPSC Success Story)
- स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात उतरताना प्रथम स्वतःचे परीक्षण करा.
- आपल्यामध्ये काय कमी आहे? स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला काय करावे लागेल हे लक्षात घ्या.
- अभ्यास सुरू करण्यापूर्वी परीक्षेची सर्व माहिती जाणून घ्या.
- कोणतीही पूर्वतयारी न करता स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरू नका. हे तुमच्यासाठी खूप धोक्याचे ठरू शकते.
- स्वतःच्या क्षमता ओळखा आणि स्वतः मध्ये किती प्रयत्न करण्याची ताकद, इच्छाशक्ती आहे हे ओळखा.
- वेळेचे नियोजन करा आणि त्या वेळेमध्येच जे काही करायचे आहे ते करा.
- जरी तुम्हाला या क्षेत्रामध्ये यश आले नाही तरी इतर भरपूर क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही खूप काही चांगले करू शकता.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com