MPCB Recruitment 2024 : मुंबईत नोकरी करण्याची संधी सोडू नका; इथे मिळेल महिना 2 लाखापर्यंत पगाराची नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण (MPCB Recruitment 2024) मंडळ अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board)
भरले जाणारे पद – प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक
पद संख्या – 61 पदे
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024

भरतीचा तपशील – (MPCB Recruitment 2024)

पद पद संख्या 
प्रादेशिक अधिकारी 02
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
वैज्ञानिक अधिकारी 02
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
प्रमुख लेखापाल 03
विधी सहायक 03
कनिष्ठ लघुलेखक 14
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 16
वरिष्ठ लिपिक 10
प्रयोगशाळा सहायक 03
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक 06

 

मिळणारे वेतन –

पद वेतन
प्रादेशिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७००
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७००
वैज्ञानिक अधिकारी एस-१९, ५५१००-१७५१००
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-१५, ४१८००-१३२३००
प्रमुख लेखापाल एस-१४, ३८६००-१२२८००
विधी सहायक एस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ लघुलेखक एस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक एस-१३, ३५४००-११२४००
वरिष्ठ लिपिक एस-०८, २५५००-८११००
प्रयोगशाळा सहायक एस-०७, २१७००-६९१००
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक एस-०६, १९९००-६३२००

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (MPCB Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://mpcb.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com