करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कर सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेच्या अंतिम निकालात अमरावतीचा मोहम्मद शाहिद मोहम्मद अय्युब यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. तर मागासवर्गीय गटातून सांगली जिल्ह्यातील मोहन पाटील आणि मुलींमधून नाशिक जिल्ह्यातील देवयानी निकम यांनी पहिला क्रमांक मिळवला.
आयोगातर्फे 6 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेतील कर सहाय्य्क या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा ऐकून 126 रिक्त पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल आयोगाने नुकताच जाहीर केला.
उमेदवारांना या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी गुणपत्रिके प्रोफाइलमध्ये पाठवल्याच्या दिनांकापासून 10 दिवसात आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तसेच खेळाडू उमेदवारांना त्यासंदर्भातील विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल नियुक्तीपूर्वी शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com