करिअरनामा ऑनलाईन । काही आयटी कंपन्या अजूनही वर्क फ्रॉम (Microsoft Recruitment) होम करण्यावर भर देत आहेत. मायक्रोसॉफ्ट ही टेक विश्वातली बडी कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीला भारतात सीनिअर आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर्स हवे आहेत. कंपनीनं सगळ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. ‘कंटेंट डॉट टेकगिग’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी पदभरती जाहीर केली आहे. पाहूया या भरतीचा तपशील सविस्तरपणे…
कंपनी – मायक्रोसॉफ्ट
भरले जाणारे पद – सॉफ्टवेअर इंजिनीअर
आवश्यक पात्रता आणि अनुभव – (Microsoft Recruitment)
- उमेदवाराकडे क्लाउड बेस्ड उत्पादनं तयार करण्याचा व शिपिंगचा 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल.
- क्लाउड बेस्ड सोल्युशन्स तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं याचाही 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव अपेक्षित आहे.
- ऑन साइट कस्टमर्सशी डील करता यावं, टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर्स पदवी किंवा इंजिनीअरिंगची पदवी उमेदवाराकडे असावी. (Microsoft Recruitment)
- अझ्युर क्लाउड आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस यामध्ये सखोल ज्ञान किंवा AWS/GCPमध्ये समान अनुभव उमेदवाराकडे असावा लागेल.
जॉब प्रोफाईल –
- या पदावर काम करणाऱ्या उमेदवारावर क्लाउड प्लॅटफॉर्ममधले सोल्युशन पॅटर्न्स शोधणं, त्यातल्या गॅप्स शोधणं, त्यांच्या मर्यादा ओळखणं, त्यातले (Microsoft Recruitment) अडथळे दूर करणं अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या असतील.
- सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठीही मायक्रोसॉफ्टनं कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे.
आवश्यक पात्रता आणि जबाबदऱ्या –
- या पदासाठी उमेदवाराकडे सॉफ्टवेअर क्षेत्रात 8 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल.
- क्लाउड बेस्ड सोल्युशन्स तयार करण्यात व अवलंबण्यात 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा लागेल.
- उमेदवाराला क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या हायब्रीड आणि नेटिव्ह क्लाउड सोल्युशन्सवर काम करावं लागेल.
- तसंच क्लाउड प्रॉडक्ट्सचं इंजिनीअरिंग (Microsoft Recruitment) मायक्रोसॉफ्टच्या ISVs किंवा क्लाउड इंजिनिअरींग टीम्ससोबत टेक सोल्युशन्स द्यावी लागतील.
- या पदावर काम करणाऱ्या उमेदवारावरही ज्युनिअर इंजिनीअरप्रमाणे क्लाउड प्लॅटफॉर्ममधले सोल्युशन पॅटर्न्स शोधणं, त्यातल्या गॅप्स शोधणं, त्यांच्या मर्यादा ओळखणं, त्यातले अडथळे दूर करणं अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या असतील. तसंच या उमेदवाराकडेही अझ्युर क्लाउड आर्किटेक्चर अँड सर्व्हिसेस यामध्ये सखोल ज्ञान किंवा AWS/GCPमध्ये समान अनुभव असावा लागेल.
आयटी क्षेत्रात सतत नोकऱ्या बदलल्या जातात. कोरोनानंतर नोकरीच्या संधी हळूहळू उपलब्ध होत आहेत. तुम्हीही ITITमध्ये नोकरी शोधत असाल, तर मायक्रोसॉफ्टमधली (Microsoft Recruitment) नोकरी ही या क्षेत्रातली उत्तम संधी असेल. विशेष म्हणजे सध्या कंपनी कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची सुविधा देत आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात राहून या पदांसाठी काम करणं शक्य होऊ शकतं. इच्छुक व पात्र उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com