Microsoft free AI Course : Microsoftने लाँच केला AI कोर्स; अगदी फ्री!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सध्या सगळीकडे आर्टिफिशिअल (Microsoft free AI Course) इंटिलिजेन्स म्हणजेच AIचा बोलबाला सुरु आहे.  तरुणांना AI मध्ये चांगलं भविष्य आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. AI मध्ये करिअर करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. टेक जगतातील मायक्रोसॉफ्ट या मोठ्या कंपनीने एक मोफत जनरेटिव्ह AI कोर्स लाँच केला आहे. लिंक्ड इन या कंपनीसोबत करार करून हा कोर्स लाँच करण्यात आला आहे. हा एक प्रोफेशनल कोर्स असणार आहे, तसंच हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटही मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्टच्या कॉर्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट केट बेहंकेन यांनी लिंक्ड इनवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. जनरेटिव्ह एआयबाबत हा पहिलाच (Microsoft free AI Course) ऑनलाईन लर्निंग कोर्स असणार आहे. 2025 सालापर्यंत या कोर्ससाठी कसलीही फी आकरण्यात येणार नाही.
असा होणार कोर्सचा फायदा (Microsoft free AI Course)
या कोर्समध्ये यूजर्सना AIसंबंधी महत्त्वाच्या गोष्टी समजावण्यात येतील. तसेच कोर्स संपल्यानंतर याचं एक सर्टिफिकेटही यूजर्सना मिळणार आहे. याचा फायदा यूजर्सना करिअरमध्ये मिळणार आहे. हा कोर्स सध्या इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com