MHT CET Exam : ‘One Nation One Exam’ धोरणाला केराची टोपली; सीईटींची संख्या पुर्वीप्रमाणेच

MHT CET Exam
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक (MHT CET Exam) वर्ष 2023-24 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमएचटी सीईटी’सोबतच विविध सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. या सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर केल्यामुळे, यंदाही सीईटींची संख्या कमी होणार नसल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक देश एक परीक्षा’ (वन नेशन वन एक्झाम) या धोरणाला राज्यात पुन्हा एकदा केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

राज्यात इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, अॅग्रिकल्चर विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘सीईटी सेल’कडून साधारण 17 सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यातच खासगी आणि अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची भर पडते. यात विद्यार्थ्यांचे पैसे आणि वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

या पार्श्वभूमीवर देशासोबतच, राज्यात देशात सीईटी परीक्षांची संख्या कमी करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र (MHT CET Exam) मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने ‘वन नेशन वन एक्झाम’च्या धोरणाची अंमलबाजवणी सुरू केली. या अंतर्गत देशात ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ची स्थापना करण्यात आली.

सीईटींची संख्या कमी होण्यासाठी ‘सीईटी सेल’चे तत्कालीन आयुक्त आनंद रायते यांनी याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्तावाद्वारे पाठपुरावा केला होता. मात्र, त्याबाबत पुढे कार्यवाही झाली नाही. त्यासोबतच तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुढील 2023 – 24 या शैक्षणिक वर्षापासून परीक्षांची संख्या कमी करण्याबाबात सकारात्मकता दर्शवली होती.

त्यानंतर सत्ताबदल झाल्यानंतर या विषयावर चर्चा झाली नाही. याबाबत येत्या काही काळात निर्णय होण्याऐवजी ‘सीईटी सेल’ने पुन्हा एकदा एमएचटी-सीईटी, एमबीए, एमसीए, एमएचएमसीटी, बीएचएमसीटी, एम-आर्च, बी-प्लॅनिंग, बी-डिझाइन अशा अभ्यासक्रमांच्या ‘सीईटीं’साठीचा अभ्यासक्रम (MHT CET Exam) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम ‘सीईटी सेल’च्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. त्यामुळे ‘सीईटी सेल’ यंदाही साधारण 17 सीईटी परीक्षा घेण्याच्या विचारात असल्याने, तूर्तास तरी ‘वन नेशन वन एक्झाम’चा विसर पडल्याचे स्पष्ट होते. याबाबत अधिक माहितीसाठी ‘सीईटी सेल’चे आयुक्त महेंद्र वारभुवन आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रियाही उपलब्ध होऊ शकली नाही.

‘वन नेशन वन एक्झाम’ हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक भाग आहे. या अंतर्गत सीईटींची संख्या कमी करून, ठरावीक विद्याशाखेसाठी एकच सीईटी घेता येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना (MHT CET Exam) केंद्राच्या सीईटी परीक्षांबरोबरच राज्याच्या सीईटी परीक्षा द्याव्या लागतात. ही परिस्थिती असतानाच, राज्यात खासगी आणि अभिमत विद्यापीठांच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी होत आहे. या सर्वांमध्ये विद्यार्थी आणि पालकांचा वेळ जात असून, मनस्ताप अधिक होत असल्याचे चित्र आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com