MHT CET 2024 : महत्वाची अपडेट!! B.A.,B.Sc., B.Ed. च्या CET परीक्षांसाठी अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

MHT CET 2024
xr:d:DAF2TZni6GE:1459,j:6657870466400136614,t:24040910
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य (MHT CET 2024) सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (Maharashtra State Common Entrance Test) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेण्यात येणाऱ्या B.A/B.Sc-B.Ed अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेकरीता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्यास 30 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती; पण आता इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात.

दरम्यान विद्यार्थी आणि पालकांकडून बी.ए/बी.एस्सी-बी.एड अभ्यासक्रमाच्या (MHT CET 2024) सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून बी.ए/बी.एस्सी-बी.एड (4 वर्ष एकात्मिक) सीईटी २०२४ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; असे सीईटी सेलने (CET Cell) परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

18 मे ला होणार परीक्षा (MHT CET 2024)
बी.ए/बी.एस्सी-बी.एड साठी परीक्षेच्या नोंदणीची अंतिम मुदत 30 मार्च देण्यात आली होती, आता ही मुदत १५ एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. तर परीक्षा येत्या १८ मे रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
असा करा अर्ज –
1. सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट द्या.
2. होम पेजवर दिलेला MAH बी.ए/बी.एस्सी-बी.एड CET 2023 टॅब निवडा. नोंदणी लिंकवर क्लिक करा.
3. नवीन उमेदवारांना नोंदणी करावी लागेल तर इतरांना पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.
4. महत्त्वाची ओळखपत्रे भरून (MHT CET 2024) फॉर्म पूर्ण करा आणि कागदपत्रे सबमिट करा.
5.आवश्यक फी भरा आणि पेमेंट पावती डाउनलोड करा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com