करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच Maharashtra Common Entrance Test लवकरच (MHT CET 2022) घेण्यात येणार आहे. राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, आणि कृषी संबंधित प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया घेण्यात येते.या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व, पदव्युत्तर प्रबंध मिळू शकतात. यंदा ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
226 परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा
MHT CET परीक्षा 2022 महाराष्ट्रातील 226 परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेची खरी (MHT CET 2022) तारीख आणि प्रवेश प्रक्रियेशी संबंधित इतर तारखा जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी MHT CET महत्त्वाच्या तारखा 2022 तपासत राहणे आवश्यक आहे.
‘या’ आहेत परीक्षेच्या तारखा (MHT CET 2022)
पीसीएम गटासाठी महाराष्ट्र सीईटी 2022 परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट आणि पीसीबी गटासाठी, 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
MHT CET प्रवेशपत्राविषयी
परीक्षा आयोजित करणारे अधिकारी सर्व यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांना MHT CET 2022 प्रवेशपत्र जारी करतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या उमेदवार पोर्टलवर लॉग (MHT CET 2022) इन करावे लागेल. वैध MHT CET प्रवेशपत्र 2022 शिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
सप्टेंबर महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल
नव्या वेळापत्रकानुसार 2 ते 25 ऑगस्टदरम्यान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ‘सीईटी’चे आयोजन केले जाणार आहे. ‘जेईई,’ ‘नीट’परीक्षा आणि विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमुळे जुलै महिन्यातील वेळापत्रक बदलून ते ऑगस्ट महिन्यात करण्यात आल्याचे ‘सीईटी’ सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षांसाठी अर्ज करण्याची (MHT CET 2022) अंतिम मुदत 12 एप्रिल होती. त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालणार असल्याने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होतील.
MHT CET साठी मोठ्या प्रमाणात नोंदणी
2022 मध्ये MHT CET साठी एकूण 6 लाख 04 हजार 780 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तंत्रज्ञानाच्या या वाढीमुळे कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे MHT CET परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्याचे मत शिक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com