करिअरनामा ऑनलाईन | अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र तसेच संबंधित विषयांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेला आज (गुरुवार) १ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थी विविध केंद्रावर प्रवास करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रमुख बसस्थानकातून दीड हजार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासंदर्भातील माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.
दीड हजार अतिरिक्त एसटी बस सोडण्यासंदर्भातील निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. MHT CET 2020
करोना विषाणू संसर्गामुळे सीईटी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने अभियांत्रिकी, वास्तुकला अशा अभ्यासक्रमांसाठीची जेईई मेन्स आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची नीट या प्रवेश परीक्षा घेण्यास मान्यता दिली. त्यानुसार जेईई मुख्य परीक्षा झाली. तर १३ सप्टेंबरला ‘नीट’ परीक्षा पार पडली. ५ लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस त्यांच्या जिल्हानिहाय संख्येनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. MHT CET 2020
कोरोनामुळे लांबलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी अशा विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) सुधारित तारखा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केल्या होत्या. त्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटाची परीक्षा १२ ते १६ ऑक्टोबर, १९ आणि २० ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६३ हजार २८४ विद्यार्थी सी.ई.टी. परीक्षा देणार आहेत. या परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहेत ,त्यानुसार विद्यार्थ्यांच्यासाठी स्थानिक आगारातून बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेवून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. MHT CET 2020
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – (https://careernama.com)
MHT CET 2020 Exam Date | राज्यातील सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या
टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर
MH CET Law 2020 | वकील बनायचय? LLB प्रवेश घ्यायचाय? अशी करा तयारी..