Megabharati : राज्याच्या विविध महापालिकांमधील रखडलेली भरती लवकरच मार्गी लागणार; 22,381 जणांना मिळणार नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील (Megabharati) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध महानगर पालिकांमधील 22,831 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नगरविकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी घेतलेल्या महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांच्या परिषदेत महानगरपालिकांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, महापालिकांना आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. आताच (Megabharati) बहुतेक महापालिकांचा आस्थापनेवरील खर्च 35 टक्क्यांपेक्षा जास्त होतो आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही रिक्त पदांवर भरती करता येणे शक्य होत नव्हते.

त्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने 14 फेब्रुवारीला नवा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार सन 2023 मध्ये करायच्या भरतीसाठी 35 टक्क्यांची ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. तरीही महापालिकांनी आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून हा खर्च 35 टक्क्यांपर्यंत (Megabharati) मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही या आदेशात देण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेमुळे तरूणांचा फायदा होईल. त्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

28 महानगर पालिकेत 22381 पदे या शासन निर्णयानुसार राज्यातील 28 महानगरपालिकांत एकूण 22381 पदे रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक 8490 पदे बृहन्मुंबई महापालिकेत (Megabharati) असून त्याखालोखाल 1578 रिक्त पदे पिंपरी-चिंचवड महापालिकेत आहेत. सर्वात कमी 81 रिक्त पदे परभणी महापालिकेत आहेत. ही सर्व पदे या वर्षात भरण्यात येतील.

महानगरपालिकेतील रिक्त पदे पुढील प्रमाणे – (Megabharati)

औरंगाबाद – १२३ पदे

सोलापूर – ३४० पदे

परभणी – ५८ पदे

मालेगाव – ६१४ पदे

अहमदनगर – १८४ पदे

अकोला – २४९ पदे

अमरावती – ४८५ पदे (Megabharati)

नांदेड वाघाळा – २०० पदे

जळगाव – ४५० पदे

धुळे – १२६ पदे

नाशिक – ६७१ पदे

पनवेल – ४१२ पदे

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com