करिअरनामा ऑनलाईन । येत्या सणासुदीच्या काळात ग्राहकांची वाढती (Meesho Jobs) मागणी पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ‘मीशो’ने कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचं ठरवलं आहे. मीशोने विक्रेता आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये जवळपास 5 लाख हंगामी नोकऱ्या देणार असल्याचे जाहिर केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्के इतकी जास्त ही वाढ आहे.
कोणत्या विभागात मिळणार नोकरी (Meesho Jobs)
ईकॉम एक्सप्रेस, डीटीडीसी, इलास्टिक रन, लोडशेअर, डिलीव्हरी, शॅडोफॅक्स आणि एक्सप्रेसबीज यांसारख्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक भागीदारीद्वारे सुमारे 2 लाख रोजगार संधी निर्माण करण्याचे मीशोचे उद्दिष्ट आहे. यातील 60 टक्क्यांहून अधिक संधी या टियर-III आणि टियर-IV भागात असणार आहेत. या नोकऱ्यांमध्ये प्रामुख्याने उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहचवणारे, डिलिव्हरी पिकिंग, सॉर्टिंग, लोडिंग, अनलोडिंग आणि रिटर्न इन्स्पेक्शन यासारख्या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
“आम्हाला या सणासुदीच्या काळात मागणीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे नोकरीच्या संधी निर्माण करण्याची प्रक्रिया ही या सणासुदीच्या काळात ग्राहकांचा एकंदरीत अनुभव वाढवण्यावर आणि असंख्य लहान व्यवसायांना सक्षम बनविण्यावर केंद्रित आहे;” असे मीशोमधील (Meesho Jobs) एक वरिष्ठ अधिकारी सौरभ पांडे यांनी सांगितेल.
भारताच्या थर्ड-पार्टी लॉजिस्टिक (3PL) इकोसिस्टममध्ये मीशोचे मोठे योगदान आहे. तसेच आर्थिक वर्ष 2023 मध्ये मीशोने थर्ड पार्टी लॉजिस्टिक शिपमेंट दुप्पट करून 1.2 अब्ज पेक्षा जास्त करण्याचा कंपनीचा विचार आहे.
मीशो विक्रेते सणासुदीच्या काळात 3 लाख हंगामी कामगारांना कामावर ठेवण्याचा अंदाज आहे. हे हंगामी कामगार ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मीशोच्या विक्रेत्यांना उत्पादन, पॅकेजिंग आणि वर्गीकरण यासह विविध कामांमध्ये मदत करतील. तसेच मीशोचे 80 टक्क्यांहून अधिक विक्रेते फॅशन अॅक्सेसरीज आणि उत्सवाची सजावट यासारख्या नवीन कॅटेगरीमध्ये देखील नवीन उत्पादने घेऊन येण्याच्या विचारात आहेत. वाढत्या मागणीसाठी तयारीचा भाग म्हणून मीशोचे 30 टक्क्यांहून अधिक विक्रेते हे सध्या स्टोरेज स्पेस भाड्याने घेण्यासाठी गुंतवणूक देखील करत आहेत.
एका अहवालानुसार या वर्षी अशा नोकऱ्यांमध्ये गेल्या (Meesho Jobs) वर्षीच्या तुलनेत 25 टक्के वाढ अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद यांसारख्या टियर-I शहरांच्या तुलनेत टियर-II आणि टियर-III शहरांमध्ये वेअरहाऊसिंग ऑपरेशन्स, डिलिव्हरी कर्मचारी आणि कॉल सेंटर ऑपरेटरची मागणी जास्त आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com