Medical Seats in Maharashtra : मेडिकल शिक्षण घेण्यासाठी स्पर्धा वाढली; राज्यात 11 हजारपेक्षा जास्त जागा उपलब्ध

Medical Seats in Maharashtra
xr:d:DAF2TZni6GE:1540,j:2002274747711655424,t:24041306
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक तरुण तरुणींना वैद्यकीय (Medical Seats in Maharashtra) क्षेत्रात अभ्यास करुन डॉक्टर होण्याची इच्छा असते. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेवून सर्वोत्तम शिक्षण शिक्षण घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र या क्षेत्रात दरवर्षी उमेदवारांची संख्या वाढत असल्याने मेडिकल क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. समान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोंच्या घरात जात आहे. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात यश न मिळाल्यास दुसऱ्या आणि तिसऱ्या संधीसाठी विद्यार्थी नेहमीच तयार असतात.

वैद्यकीय प्रवेशासाठी स्पर्धा वाढली (Medical Seats in Maharashtra)
गेल्या वर्षी देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी शाखा अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या १ लाख २५ हजार होती. या जागांवर प्रवेशासाठी तब्बल २१ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी नीट (NEET) परीक्षा दिली. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या २४ लाखांवर जाणार आहे. जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे.

प्रवेशासाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना नीटने आणखी २ दिवस दिले होते. याआधी अर्ज करणाऱ्यांची संख्या २३ लाख ८१ हजार ९३३ होती. आता ती २४ लाखांच्या (Medical Seats in Maharashtra) पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. सध्या २५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तर ४ शासकीय दंत महाविद्यालये आहेत. येत्या काही दिवसात ही संख्या ३२ होईल.

वैद्यकीय शिक्षणातील वाढत्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रात एमबीबीएसच्या (MBBS) जागाही वाढल्या आहेत. यावेळी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश दिले जाणार आहेत. राज्यातील ३२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ५ हजार १२५ जागा आहेत. यामध्ये नागपूर एम्स, पुणे (Medical Seats in Maharashtra) एएफएमसी आणि मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. तर खासगी महाविद्यालयांमध्ये ३ हजार ५१० जागा आहेत. तर अभिमत विद्यापीठांमध्ये २ हजार ५१० जागा आहेत. सध्या राज्यात एकूण ११ हजार १४५ जागा उपलब्ध आहेत. बहुतांश विद्यार्थी शासकीय महाविद्यालयांकडे धाव घेतात. परंतु त्यासाठी उच्चांकी गुणांची आवश्यकता असते. यामुळेच ४० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी दुसऱ्यांदा प्रवेश परीक्षा देतात.

अशी आहे विद्यार्थी संख्या –
वैद्यकीय ‘नीट’ चाळणी परीक्षेसाठी – २४ लाख विद्यार्थी
खासगी वैद्यकीय महाविद्यालय – ३,५१० जागा
अभिमत विद्यापीठ – २,५१० जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – ५,१२५ जागा
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com