Medical Education : मराठीतून मेडिकलचे शिक्षण घेणे कठीण?

करिअरनामा ऑनलाईन । MBBS आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून (Medical Education) देण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वैद्यकीय शिक्षण हे मराठी भाषेतून सुरू करण्यात येणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे कठीण असल्याचे चित्र आहे.

जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे आणि त्यामुळेच डॉक्टरांची निर्मिती पुरेशा प्रमाणात होऊ शकेल. मात्र मराठीतून वैद्यकीय शिक्षणाचा विचार होत असेल तर नक्कीच कठीण वाटते. सर्व पुस्तके, साहित्य, पाक्षिके इंग्रजीत असताना मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे (Medical Education) कसे काय शक्य होणार आहे याविषयी शंकाच आहे, असे मत ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे साथी व संसर्गजन्य विभागाचे माजी राष्ट्रीय प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

गंगाखेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले; प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय नक्कीच उपयुक्त ठरेल. अजूनही डॉक्टरांची (Medical Education) संख्या पुरेशी नसल्याने या निर्णयामुळे मोठ्या संख्येने डॉक्टरांची निर्मिती होईल. वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहील, यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणा आहे.

तसेच अतिरिक्त प्रमाणात डॉक्टरांची निर्मिती झालीच तर या क्षेत्राकडे विद्यार्थी वळण्याचे प्रमाण कमी होईल, जसे अभियांत्रिकी शिक्षणाबाबत एका टप्प्यावर झाले होते. मात्र (Medical Education) मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार स्थानिक भाषेतून म्हणजेच मराठीतून वैद्यकीय शिक्षण देण्याचा विचार करत असेल किंवा तशा हालचाली सुरू असतील, तर मात्र नक्कीच कठीण वाटते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com