MBA Entrance Exam : देशातील टॉप MBA कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ‘या’ परीक्षा करा पास; पहा यादी..

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | MBA करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस (MBA Entrance Exam) वाढत आहे. यासोबतच देशभरात अनेक एमबीए महाविद्यालयेही (MBA Colleges) उघडली आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नक्की कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? तुम्हाला जर देशातील टॉप बिझनेस स्कूलमधून मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घ्यायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

IIM आहे भारतातील सर्वोच्च एमबीए कॉलेज
करिअर पर्यायांच्या यादीमध्ये MBA शिक्षणाचा समावेश होतो. चांगल्या कॉलेजमधून एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला लाखोंच्या पगाराच्या पॅकेजसह चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकते. आयआयएम (IIM) हे भारतातील सर्वोच्च एमबीए महाविद्यालय मानले जाते. या आणि इतर टॉप बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी कॅट (CAT) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. MBA अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कोणत्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात हे जाणून घेवूया.

एमबीए प्रवेशासाठी परीक्षेची यादी (MBA Entrance Exam)
1. कोणत्याही प्रवाहात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो.
2. यासाठी CAT, MAT, GMAT, XAT, CMAT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
3. अनेक संस्था स्वतःच्या प्रवेश परीक्षाही घेतात.
4. बऱ्याच एमबीए महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, एमबीए प्रवेश परीक्षेच्या यादीमध्ये समाविष्ट असलेली कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
5. आयआयएम म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश हा कॅट परीक्षेच्या स्कोअरद्वारे केला जातो.

देशातील अग्रणी एमबीए संस्था पुढीलप्रमाणे आहेत
उच्च शिक्षणासाठी कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी NIRF रँकिंग तपासणे आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्हाला टॉप एमबीए कॉलेज, प्लेसमेंट, पॅकेज आणि (MBA Entrance Exam) इतर सुविधांबद्दल माहिती मिळेल. NIRF रँकिंग 2023 नुसार देशात टॉप ठरलेल्या एमबीए महाविद्यालयांची यादी पुढे देत आहोत.
1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIMA)
2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगळुरू (IIMB)
3. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड (IIMK)
4. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता (IIMC)
5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIMD)
6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ (IIML)
7. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई
8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर (IIM इंदूर)
9. XLRI- झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जमशेदपूर (XLRI)
10. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IITB)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com