अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । मराठा आंदोलकाच्या विरोधानंतर राज्य सरकारने MPSC परीक्षा पुढे ढकलली पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. MPSC परीक्षा पुढे ढकलायची का याबाबत सरकारच्या प्रमुख मंत्र्यांची आज संध्याकाळी बैठक होणार होती. त्यानुसार MPSC परीक्षेबाबत गेल्या दीड तासापासून सह्याद्री अतिथी गृहावर मंत्रिमंडळाची बैठक सुरु होती. याबैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. उद्या रविवारी ११ ऑक्टोबरला MPSC परीक्षा होणार होती. दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलायची की नाही याबाबत चर्चा झाली. त्यानंतर MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचा हा निर्णय जाहीर करण्यात आला.

“११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. मात्र करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही..
MPSC च्या परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. मात्र यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाजाकडूनही आम्हाला परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती. आता जे विद्यार्थी परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. काही विद्यार्थी करोनाग्रस्त आहेत. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळालेला नव्हता. त्यामुळे ११ ऑक्टोबरची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र आता जी काही तारीख जाहीर होईल त्यामध्ये बदल होणार नाही. असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.