Mahavitaran Recruitment 2024 : 10+2 पास उमेदवारांसाठी महावितरणमध्ये नोकरी; 5347 पदांवर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran Recruitment 2024) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 5347 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
भरले जाणारे पद – विद्युत सहाय्यक
पद संख्या – 5347 पदे
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Mahavitaran Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024
परीक्षा फी –
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
2. मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST

भरतीचा तपशील – (Mahavitaran Recruitment 2024)

अ.क्र.संवर्गप्रवर्गपद संख्या
1.विद्युत सहाय्यकअनुसूचित जाती673
अनुसूचित जमाती491
विमुक्त जाती (अ)150
भटक्या जाती (ब)145
भटक्या जाती (क)196
भटक्या जाती (ड)108
विशेष मागास प्रवर्ग108
इतर मागास प्रवर्ग895
ईडब्ल्यूएस500
अराखीव2081
एकूण5347

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा (Mahavitaran Recruitment 2024) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन –

पदवेतन
विद्युत सहाय्यकप्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

भरती संदर्भात महत्वाच्या तारखा –

1. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना प्रकाशित झाल्याची तारीख29 डिसेंबर 2023
2. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात01 मार्च 2024
3. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख20  मे 2024

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Mahavitaran Recruitment 2024)
3. सविस्तर निवेदन / सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.mahadiscom.in वर प्रसिध्द करण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com