Mahavitaran Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी मेगाभरती!! महावितरणमध्ये 5347 पदांवर भरती सुरु; झटपट करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (Mahavitaran Recruitment 2024) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विद्युत सहाय्यक पदांच्या तब्बल 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 12 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक मानधन देण्यात येणार आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (Mahavitaran Recruitment 2024) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे. तब्बल 5347 जागांवर ही भरती होत असून जास्तीत जास्त उमेदवारांना इथे नोकरीची संधी मिळणार आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
भरले जाणारे पद – विद्युत सहाय्यक
पद संख्या – 5347 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२४
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे
परीक्षा फी – (Mahavitaran Recruitment 2024)
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
2. मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

भरतीचा तपशील –

संवर्गप्रवर्गपद संख्या
1.विद्युत सहाय्यकअनुसूचित जाती673
अनुसूचित जमाती491
विमुक्त जाती (अ)150
भटक्या जाती (ब)145
भटक्या जाती (क)196
भटक्या जाती (ड)108
विशेष मागास प्रवर्ग108
इतर मागास प्रवर्ग895
ईडब्ल्यूएस500
अराखीव2081
एकूण5347

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment 2024)

पदशैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यकमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण (Mahavitaran Recruitment 2024)

मिळणारे वेतन –

पदवेतन
विद्युत सहाय्यकप्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-

काही महत्वाच्या तारखा –

1. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अधिसूचना प्रकाशित झाल्याची तारीख29 डिसेंबर 2023
2. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात01 मार्च 2024
3. महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मार्च 2024

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com