Mahavitaran Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! महावितरण अंतर्गत 107 पदांवर नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, (Mahavitaran Recruitment 2024) गडचिरोली येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA) पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 21 जून 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर….

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA)
पद संख्या – 107 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली
वय मर्यादा –
1. 18 ते 32 वर्ष (Mahavitaran Recruitment 2024)
2. मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथीलक्षम
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 21 जून 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
विजतंत्री 54 पदे
तारतंत्री 40 पदे
कोपा 13 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
विजतंत्री 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण
तारतंत्री 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन तारतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण
कोपा 1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

आवश्यक कागदपत्रे –
1. एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री / तारतंत्री चार सत्र (4 सेमीस्टर ) / व कोपा या व्यवसायातील दोन सत्रांची (2 सेमीस्टर) उत्तीर्ण गुणपत्रिकेची मुळ प्रत.
2. आधारकार्ड
3. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहीवासी प्रमाणपत्र
4. इतर सर्व अनुषंगीक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करुन अपलोड करावे व सुसंगत असलेली माहिती भरावी.
असा करा अर्ज –
1. या पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.
3. इतर कोणत्याही माध्यमातून (Mahavitaran Recruitment 2024) आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. अर्ज प्रक्रिया 21 जून 2024 पासून सुरु होईल.
6. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://www.mahadiscom.in/en/home/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com