करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (MahaTransco Recruitment 2023) कंपनी मर्यादित, कराड अंतर्गत शिकाऊ उमेदवारांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री पदाच्या एकूण 46 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, कराड
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 46 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, जि. सातारा
वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MahaTransco Recruitment 2023)
1. शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
ऑनलाईन अर्ज प्राप्त उमेदवारांना दस्तऐवज / शैक्षणिक कागदपत्रे पडताळणी करीता ई-मेलव्दारे दिनांक, वेळ व स्थळ कळविण्यात येईल. त्याकरीता खाली नमूद केलेल्या दस्तऐवजांसह व शैक्षणिक कागदपत्रांसह उमेदवारांनी उपस्थितीत रहायचे आहे.
1. पासपोर्ट साईज फोटो – 2 (रंगीत)
2. ऑनलाईन नोंदणीचे दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे (मुळ प्रती)
3. शाळा सोडल्याचा दाखला, बोर्ड प्रमाणपत्र.
4. आय. टी. आय गुणपत्रक (चारही सत्र)
5. मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र. (नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र)
6. आधारकार्ड, बँक पासबुक (मुळ प्रत )
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
4. शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर फोटो, मुळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन करुन योग्य रितीने ऑनलाईन अर्ज सादर करावा. फोटो अथवा मुळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
5. ऑनलाईन अर्ज सादर करताना एस. एस. सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व आय. टी. आय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नाव व आधारकार्ड नमुद केलेले नाव सुसंगत असावे. (MahaTransco Recruitment 2023)
6. ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्य:स्थितीत कार्यान्वित असणारा ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याची पुर्ण जबाबदारी उमेदवारावर राहील.
7. दिलेल्या मुदतीनंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1
PDF जाहिरात 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com