करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco Recruitment 2023) अंतर्गत मोठी भरती होणार आहे. विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 पदांच्या एकूण 2541 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
भरले जाणारे पद – विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2
पद संख्या – 2541 पदे
वय मर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2023
भरतीचा तपशील – (MahaTransco Recruitment 2023)
पद | पद संख्या |
विद्युत सहाय्यक (पारेषण) | 1903 पदे |
वरिष्ठ तंत्रज्ञ | 124 पदे |
तंत्रज्ञ 1 | 200 पदे |
तंत्रज्ञ 2 | 314 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
विद्युत सहाय्यक (पारेषण) | राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान | केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. |
वरिष्ठ तंत्रज्ञ | शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक |
तंत्रज्ञ 1 | शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक |
तंत्रज्ञ 2 | शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
विद्युत सहाय्यक (पारेषण) | अ) प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये १५०००/- दरमहा ब) द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये १६०००/- दरमहा क) तृतीय वर्ष एकत्रित मानधन रुपये १७०००/- दरमहा |
वरिष्ठ तंत्रज्ञ | रु. ३०८१०-१०६०-३६११०-११६०- ४७७१०-१२६५-८८१९० |
तंत्रज्ञ 1 | रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०- ४५३१०-११६०-८२४३० |
तंत्रज्ञ 2 | रु.२९०३५-७१०- ३२५८५-९५५-४२१३५- १०६०-७२८७५ |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (MahaTransco Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com