पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या १० वी आणि १२वीचीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर१०वी, १२वीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत असं बैठकीतील चर्चेत समोर आलं. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे.
राज्यात सध्या १०वीचे १६ लाख, तर १२वीचे १४लाख विद्यार्थी आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा २३ एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे.
यंदाच्या वर्षी १०वीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होईल तर २१ मे रोजी १२वीचा शेवटचा पेपर असेल, तर १०वीची परीक्षा २९ एप्रिल ते २९मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. १०वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि १२वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.