करीअरनामा । अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षार्थी हे परीक्षा कधी होणार ह्या चिंतेमध्ये होते. मात्र आज अखेर आयोगाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ह्या परीक्षांमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व व अभियांत्रिकी परीक्षा असणार आहे.
आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 देखील 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.
कोरोना महामारी व त्यामुळे झालेले लोकडाउन यांमुळे ह्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक हे विचलित झाले होते. मात्र आता आयोगाने परीक्षा वेळापत्रक देऊन विध्यार्थी यांना दिलासा दिला आहे.
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com