Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची ‘लेक लाडकी’ योजना; मुलींना शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये रोख

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचा अर्थ संकल्प सादर करताना अर्थमंत्री (Maharashtra Budget 2023) देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना 75 हजार रुपये रोख मिळणार आहेत. ‘लेक लाडकी’ या नावानं ही योजना फडणवीस यांनी जाहिर केली आहे.

काय आहे ‘लेक लाडकी’ योजना?

यावेळी फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक (Maharashtra Budget 2023) कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता चौथीत 4,000 रुपये, सहावीत 6,000 रुपये, अकरावीत 11,000 रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.

महिलांना निम्म्या दरात एसटी प्रवास (Maharashtra Budget 2023)

राज्यातील महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास तिकीट दरात सरसकट 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. महिला खरेदीदाराला घर खरेदी (Maharashtra Budget 2023) करताना 1 टक्का सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार 15  वर्षांपर्यंत महिलेला पुरुष खरेदीदाराला घराची विक्री करता येत नाही. ही अट शिथील करुन इतर सवलती देण्यात येणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com