Mahapareshan Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी महापारेषण अंतर्गत नोकरीची मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण (Mahapareshan Recruitment 2024) कंपनी लिमिटेड, बारामती अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षक (इलेक्ट्रीशियन) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, बारामती
भरले जाणारे पद – शिक्षक (इलेक्ट्रीशियन)
पद संख्या – 32 पदे (Mahapareshan Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – बारामती

वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10 वी) उत्तीर्ण.
2. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
असा करा अर्ज (Mahapareshan Recruitment 2024 ) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com