MahaJyoti Arthik Sahay Yojana: महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाज्योती (महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळ) संस्थेच्या वतीने MPSC पूर्व परीक्षा-2024 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025 असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज हा www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरून स्वीकारले जातील. तर यासाठी आवश्यक पात्रता , अटीशर्ती , कागदपत्रे काय आवश्यक असतील याची माहिती जाणून घेऊयात.
पात्रता अटी –
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
अर्जदार हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) असावा.
अर्जदाराने MPSC पूर्व परीक्षा 2024 (08 एप्रिल 2025 रोजीचा निकाल) मध्ये यश मिळवलेला असावा.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अन्य संस्थांकडून (जसे सारथी, पुणे) याच परीक्षेसाठी कोणतेही आर्थिक सहाय्य घेतलेले नसावे.
आवश्यक कागदपत्रे (MahaJyoti Arthik Sahay Yojana) –
आधार कार्ड (दोन्ही बाजूंनी)
जातीचे प्रमाणपत्र
वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र
निकालाची प्रत (बैठक क्रमांक स्पष्ट दाखवलेली असावी)
अर्ज कसा करावा –
महाज्योतीच्या संकेतस्थळावर “Application Invited For Financial Assistance” या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा.
सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट व स्वाक्षरीसह स्कॅन करून अपलोड करावीत.
पोस्ट किंवा ई-मेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
महत्वाची माहिती –
अर्ज करताना विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
अर्ज नाकारण्याचा, जाहिरात रद्द करण्याचा किंवा मुदतवाढ न देण्याचा पूर्ण अधिकार महाज्योतीकडे राहील.
अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्यास 0712-2870120/21 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] वर ई-मेल पाठवावा.