MAFSU Recruitment 2024 : थेट मुलाखतीने होणार निवड!! राज्यातील ‘या’ विद्यापीठात नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU Recruitment 2024) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) / प्रोजेक्ट असोसिएट I, वरिष्ठ रिसर्च फेलो/ प्रोजेक्ट असोसिएट II ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित विषयातील पदवीधारक उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.

संस्था – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर
पद संख्या – 2 पदे
भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) / प्रोजेक्ट असोसिएट I
उमेदवाराने पशुवैद्यकीय/जीवन विज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य शिक्षण घेतले असावे.
2. वरिष्ठ रिसर्च फेलो/ प्रोजेक्ट असोसिएट II (MAFSU Recruitment 2024)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय / जीवन विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य आणि औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थामध्ये संशोधन आणि विकास किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान
संघटना; आणि वैज्ञानिक क्रियाकलाप आणि सेवा यामध्ये शिक्षण घेतले असावे.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 एप्रिल 2024 रोजी 35 वर्षे असावे
मिळणारे वेतन – 28,000/- रुपये ते 35,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 08 एप्रिल 2024
मुलाखतीचे ठिकाण – The Committee hall of Nagpur Veterinary College, Nagpur.

काही महत्वाच्या लिंक्स – (MAFSU Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nvcnagpur.net.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com