करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एक महत्त्वपूर्ण (M. Phil Degree) अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत पुढील सत्रापासून एमफिल (M. Phil) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या आधारावर नवीन सत्रापासून या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
महाविद्यालयीन एम. फील डिग्री आता कायमची बंद होणार आहे. या धर्तीवर देशभरातील सर्व महाविद्यालयांना एम. फील डिग्रीचं अॅडमिशन न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मास्टर ऑफ फिलॉसॉफी ही डिग्री आता कायमची बंद होणार आहे. यूजीसीचे सेक्रेटरी मनीष जोशी यांनी महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांनादेखील या कोर्ससाठी अॅडमिशन न घेण्याचं आवाहन केलं आहे. यूजीसीकडून याबाबतचा आदेश आजच पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढच्या शैक्षणिक वर्षापासून एम. फील डिग्रीसाठी अॅडमिशन अधिकृतपणे बंद होणार आहे.
एम. फील मान्यताप्राप्त डिग्री नाही – UGC
यूजीसीने याबाबत एक नोटीस जारी केली आहे. एम. फील मान्यताप्राप्त डिग्री नाही, असं युसीजीचे म्हणणे आहे. एम. फील म्हणजेच मास्टर ऑफ फिलॉसॉफी डिग्री ही दोन वर्षांची (M. Phil Degree) पोस्टग्रॅज्युएट अॅकेडमिक रिसर्च प्रोग्राम होतं, जे पीएचडीसाठी प्रोव्हिजन इनरोलमेंटसारखं काम करतं. पण आता युजीसीने डिग्रीची मान्यता रद्द केल्याने आता विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी अॅडमिशन घेता येणार नाही.
3 वर्षापूर्वी करण्यात आली होती शिफारस (M. Phil Degree)
काही महाविद्यालये एम.फीलच्या शिक्षणासाठी प्रेवश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करत आहेत. पण महाविद्यालयांनी तसं करु नये. कारण ही डिग्री मान्यता प्राप्त नाही, असं यूजीसीने म्हटलं आहे. या डिग्रीला डिस्कन्टीन्यू करण्याची शिफारस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून या डिग्रीला अमान्य करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com