Loco Pilot Bharti 2022 : खुशखबर!! लोको पायलटच्या भरतीचा मार्ग मोकळा; 448 उमेदवारांना लवकरच मिळणार नोकरी!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये 2018 मध्ये असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया (Loco Pilot Bharti 2022) राबवण्यात आली होती. त्यात मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या पात्र प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या रेल्वे भरती बोर्डच्या उमेदवारांना मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली; मात्र आत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या पुढाकारामुळे मुंबईच्या उमेदवारांना आता ही संधी दिली जाणार आहे; याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे.

लोको पायलट भरतीमधील काही ठळक गोष्टी – (Loco Pilot Bharti 2022)

  • रेल्वेने असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया 2018 मध्ये राबवली होती. यामध्ये गोरखपूरच्या उमेदवारांना आरआरबी मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली होती.
  • यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील प्रतीक्षा यादीवरील असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती.
  • ही बाब केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
  • त्यामुळे मुंबईतील रिक्त जागांची गरज भागवून मुंबईच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. याविषयी मध्य रेल्वेने प्रसिद्धिपत्र काढले आहे.
  • तसेच भारतीय रेल्वे भरती बोर्डाच्या एकूण सात हजार 448 उमेदवारांचे प्रश्नसुद्धा मार्गी लागणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com