Inspirational Story । एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही खूप मोठी गोष्ट समाजामध्ये समजली जाते. असाच कठीण प्रसंग कोमल गणात्रा या महिलेवर आला. पण त्यांनी धीरगंभीर होऊन एक निर्णय घेतला तो म्हणजे UPSC परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे !
कोमल गणत्रा यांचे लग्न एका एनआरआय मुलाशी झाले होते. लग्न झाल्यावर त्यांनाही आपले आयुष्य पूर्ण झाल्यासारखे वाटले. पण तसे झाले नाही. नवरा मुलगा लग्नानंतर पंधरा दिवसात परत न्यूझीलंडला गेला. यांना खूप वाईट वाटले पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न मनात पक्के केले होते. त्यांनतर त्यांनी परीक्षा दिली व त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
गुजराती मीडियममधून कोमल लग्नाच्या वर्षीच साहित्याच्या विषयात टॉपर म्हणून यशस्वी झाल्या. लग्नाआधी त्या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आहे. कोमल यांनी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे. सोबतच त्यांनी तीन वेगवेगळ्या भाषांची तीन विद्यापीठांमधून पदवी मिळवली आहे. गुजरात लोक सेवा आयोगाची मुख्य परीक्षाही पास केली होती. मात्र त्यावेळी पतीनं त्यांना मुलाखतीसाठी जाण्याची परवानगी दिली नव्हती. कोमल सुद्ध्या रक्षा मंत्रालयात एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com