करिअरनामा । कोल्हापुरातील शाहू मैदान ते नंदगाव या मार्गावरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. मात्र गावात बसचं येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखाच्या कार्यालयातच कॉलेज भरवत अनोखे आंदोलन केले आहे. संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले.
शाहू मैदान ते नंदगाव हा मार्ग कोल्हापूर शहराची दक्षिणेची हद्द संपल्यानंतर लागूनच असल्याने या मार्गावर नंदगाव, वडगाव तसेच गिरगाव गावांमधील भाजीपाला विकणाऱ्या तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. असे असतानाही एसटीच्या ढिसाळ कारभाराने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याचा सर्वाधिक फटका गिरगावमधील महाविद्यालयीन तरुण तरुणींना बसत होता. त्यामुळे संतापलेल्या गिरगावमधील महाविद्यालयीन तरुणांनी संभाजीनगर बसस्थानकात जाऊन अनोखे आंदोलन केले. त्यानंतर आगार व्यवस्थापक खाडे यांनी आंदोलनाची दखल घेत गिरगावसाठी विशेष बससह महाविद्यालयीन वेळेत दोन बस सोडण्याची ग्वाही दिली. तेव्हा कुठे विदयार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.