किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम केले तर बिघडले कुठे? उलट यामुळे लोकांना जास्तीत जास्त सार्वजनिक ट्रान्सपोर्ट वापरण्यास प्रवृत्त करण्यास मदतच होईल आणि त्याच्या परिणामी प्रदूषण देखील नियंत्रित केले जाऊ शकते.

असो, मात्र इथे आपल्याला हे सांगणे आवश्यक आहे की या बातमीच्या स्त्रोताची अजूनही पुष्टी झालेली नाही आहे आणि त्यामुळे ती एक फेक न्यूज ठरते आहे.

a

हे छायाचित्र म्हणजे आपल्या नावावर मोठे कर्ज असलेल्या व्यापारी विजय मल्ल्याच्या सुटकेची चेष्टा करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते आहे. इतकेच काय, तर त्याने किंगफिशरच्या बर्‍याच कर्मचार्‍यांचा पगार अजूनही दिलेला नाही आणि आपली एअरलाइन्स बंद करून त्याने अनेकांना बेरोजगार केले आहे. अशातच या महिलांना कंडक्टर म्हणून नोकरी देण्यास काहीच हरकत नाही कारण महिलांनी जर त्यांच्या नोकरीसाठी योग्य ती काळजी घेतली तर ते कोणतेही काम करण्यास सक्षम आहेत. खरं तर, वरील फोटो हा जरी फक्त मनोरंजनासाठी शेअर केला गेला असला तरी, भारतातील काही राज्यांमध्ये, बस कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या महिलांना आपण पाहू शकतो