Job Notification : राज्याच्या ‘या’ बँकेत व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी; संधीचं सोनं करा!!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । श्री छत्रपती राजर्षी शाहू (Job Notification) अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड येथे रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक सरव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.

बँक – श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड
भरले जाणारे पद – सहाय्यक. सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – बीड

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
सहाय्यक. सरव्यवस्थापक 01
शाखा व्यवस्थापक 02
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहाय्यक. सरव्यवस्थापक C.A. (Chartered Accountant)
शाखा व्यवस्थापक एम. कॉम प्रथम स श्रेणी उत्तीर्ण, GDC&A

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. या पदांकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2024 आहे.
3. इच्छुक उमेदवारांनी आपला (Job Notification) अर्ज मुदती अगोदर सादर करावा.
4. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची छायांकीत प्रत व अनुभव प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्राची एक प्रत (Hard Copy) बँकेच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष जमा करणे अथवा बँकेच्या शाखेच्या ठिकाणी देणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – https://shahubank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com