Job Notification : शिर्डीच्या साईबाबा संस्थानात ‘या’ पदावर नोकरीची संधी; तुम्ही पात्र आहात का?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी येथे (Job Notification) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. अधिनियम, २००४ कलम ५ मधील तरतुदीनुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जास्तीत जास्त 15 अन्य सदस्य याप्रमाणे एकूण 17 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात येणार आहेत. या समितीवर शिर्डी नगरपंचायतीचा अध्यक्ष हा पदसिध्द सदस्य असेल. सदर तरतुदीनुसार श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), (व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नियुक्ती आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने) नियम २०१३ व श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) (व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची नियुक्ती आणि प्रतिज्ञापत्राचे नमुने) (सुधारणा) नियम, २०२१ नुसार सदस्यांची अर्हता खालीलप्रमाणे आहे. या भरतीसाठी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

संस्था – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी
भरले जाणारे पद – (Job Notification)
1. अध्यक्ष – 01 पद
2. उपाध्यक्ष – 01 पद
3. सदस्य – 15 पदे
पद संख्या – 17 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – शिर्डी, अहमदनगर
वय मर्यादा – 25 ते 70 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. अध्यक्ष – विशिष्ट अर्हता / अनुभवाची अट नाही. विशेषीकृत ज्ञान या गटातील व्यक्ती
2. उपाध्यक्ष – विशेषीकृत ज्ञान या गटातील व्यक्ती (Job Notification)
3. सदस्य (महिला) विशिष्ट अर्हता / अनुभवाची अट नाही.

सदस्य – 15 पदे
1. सदस्य (सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक) जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र तसेच कमी उत्पन्नाचा दाखला.
2. सदस्य (विधी) विधिमधील पदवी (एल.एल.बी) धारण केलेली असावी आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेकडे किमान ५ वर्षाकरिता अधिवक्ता म्हणून नोंदणी केलेली असावी आणि जिल्हा न्यायाधीश किंवा प्रबंधक, उच्च न्यायालय यांनी दिलेले वकील व्यवसाय प्रमाणपत्र धारण केलेली असावे.
3. सदस्य (व्यवसाय व्यवस्थापन) व्यवसाय प्रशासनामधील पदवी (बी. बी.ए.) किंवा अन्य समतुल्य पदवी व्यवस्थापकीय पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव धारण केलेली असावी किंवा भारतीय सनदी लेखापाल संस्थेकडे किमान ५ वर्षाच्या कालावधीकरिता सनदी लेखापाल म्हणून नोंदणी केलेली असावी किंवा अर्थशास्त्र अथवा वित्तव्यवस्था यांमधील पदवी धारण केलेली असावी. (Job Notification)
किंवा
लोक प्रशासनामधील पदवी आणि किमान ५ वर्षांचा अनुभव | धारण केलेली असावी किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसेल अशा पदावरुन सेवानिवृत्त झालेली व्यक्ती असावी.
4. सदस्य (अभितांत्रिकी व वास्तुशास्त्र) मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी (बी.ई) किंवा पदविका आणि अभियांत्रिकी उपक्रमांमधील किमान ५ वर्षांचा अनुभव धारण केलेली असावी. किंवा
वास्तुशास्त्रामधील पदवी (बी.आर्क.) किंवा पदविका आणि ५ वर्षाचा अनुभव.
एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस. / बी. यु.एम.एस. / बी.एच.एम.एस. पदवी धारण करणारी असावी आणि रुग्णालय प्रशासन किंवा आरोग्य संस्था यामधील किमान ५ | वर्षांचा अनुभव असलेली वैद्यक व्यवसायी.
5. सदस्य (सार्वजनिक आरोग्य) एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस. / बी. यु.एम.एस. / बी.एच.एम.एस. पदवी धारण करणारी असावी आणि रुग्णालय प्रशासन किंवा आरोग्य संस्था यामधील किमान ५ वर्षांचा अनुभव असलेली वैद्यक व्यवसायी. (Job Notification)
6. सदस्य (ग्रामीण विकास) कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवीधर असावी आणि ग्रामीण क्षेत्रांच्या विकासामधील किमान ५ वर्षाचा अनुभव आणि प्राविण्य मिळवलेले असावे. तसेच राज्य किंवा केंद्र शासनाने त्यास मान्यता दिलेली असावी.
7. सदस्य (सर्वसाधारण) 1) एकतर जे भक्तमंडळाचे आश्रयदाते किंवा आजीव सदस्य असतील. आणि
2) पुढीलपैकी सर्व किंवा त्यापैकी कोणताही घटक विचारांत घेण्यात येतील:- (एक) स्नातक पदवी धारण करणे;
(दोन) शिर्डीतील किंवा अहमदनगर जिल्हयातील रहिवाशी असणे;
(तीन) सामाजिक किंवा शैक्षणिक बांबीमध्ये अथवा सामाजिक किंवा शैक्षणिक विकासामध्ये व्यक्तीने दिलेले योगदान;
(चार) शिर्डीचे प्रतिनिधित्व करणारा संसद सदस्य अथवा शिर्डी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारा राज्य विधानमंडळाचा सदस्य असणे.

असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर अर्ज सादर करण्याचे साधन/पद्धती स्वीकारली जाणार नाही. (Job Notification)
3. विहीत वेळेनंतर / दिनांकानंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – sai.org.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com