Job Notification : कोल्हापूर महानगरपालिकेत ‘या’ पदावर नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत (Job Notification) पशुवैद्यकीय डॉक्टर पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  व्यक्तीशः भेटून अर्ज करायचा आहे.

संस्था – कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
भरले जाणारे पद – पशु वैद्यकीय डॉक्टर
अर्ज करण्याची पद्धत – व्यक्तीशः (Job Notification)
अर्ज घेवून येण्याचा पत्ता – पशुवैदयकिय कार्यालय, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर व्यक्तीशः संपर्क साधावा.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2023 आहे.
3. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
कामाचे स्वरुप –
1. पॅनेलवरील पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी उन्नाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक शस्त्रक्रिया पुर्व तयारी करणे.
2. पॅनेलवरील पशु वैद्यकीय डॉक्टर (Job Notification) यांनी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक भूल देणे.
3. पॅनेलवरील पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी शस्त्रक्रिया करणे.
4. शस्त्रक्रिया केलेनंतर त्या बाबतची खुण शस्त्रक्रिया केलेल्या कुत्र्याच्या कानावरती करायची आहे.
5. पॅनेलवरील पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी शस्त्रक्रिया नंतर ची देखभाल व औषध उपचार करायचा आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://kolhapur.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com