Job in Canada : कॅनडामध्ये मिळतात जास्त नोकऱ्या; पगारही मिळतो तगडा, वाचा एक खास रिपोर्ट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही जर कॅनडामध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण (Job in Canada) एक ते दोन नाही तर दहा लाख नोकरीच्या संधी सध्या कॅनडामध्ये तुम्हाला मिळू शकतात. होय, कॅनडामध्ये जवळपास वन मिलीयन जॉब व्हॅकंसिज असून रोजगार दर सर्वाधिक म्हणजेच इतर देशांच्या तुलनेत 5.7 पटीने जास्त आहे.

अलीकडेच कॅनडाने जॉब व्हेकंसीबाबतचा एक अहवाल आणि सर्वे रिपोर्ट जारी केला होता. यामध्ये यंदा नोकरीसाठी 4.7 पटीने व्हेकंसी वाढल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 42.3 टक्क्यांनी जास्त आहे. अहवालात असेही निदर्शनास आले आहे की सर्व क्षेत्रांमध्ये देऊ केलेल्या सरासरी तासाच्या वेतनात वाढ झाली आहे. 2021 च्या तुलनेत, ऑफर केलेले सरासरी तासाचे वेतन 5.3% वाढले असून ते प्रति तास $24.05 झाले आहे.

आणखी कोणत्या देशांतील नोकरीच्या संधी वाढल्या? (Job in Canada)

ओंटारियोमध्ये सर्वाधिक म्हणजेच 6.6% वाढ झाली असून याठिकाणी एकूण 379,700 नोकऱ्या रिक्त आहेत. नोव्हा स्कॉशियामध्ये देखील नोकऱ्यांमध्ये 6% वाढ झाली आहे. तर ब्रिटिश कोलंबिया, मॅनिटोबा, अल्बर्टा आणि क्युबेकमध्ये नोकरीत 5.6% वाढ झाली आहे. यामध्ये नोकरीच्या रिक्त पदांमध्ये घट दर्शवणारा एकमेव प्रांत न्यू ब्रन्सविक होता. या देशात केवळ पंधरा हजार रिक्त पदे आहेत.

‘या’ क्षेत्रात सर्वाधिक पदे रिक्त

2021 च्या क्वार्टर रिपोर्टनुसार आरोग्यसेवा आणि सामाजिक साहाय्य क्षेत्रात २९ टक्के रिक्त जागा वाढल्या आहेत. आरोग्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी तर रूग्णसेवा तात्पुरत्या (Job in Canada) बंदही कराव्या लागल्या आहेत. सर्वात मोठी वाढ नॅचरल आणि अप्लाईड सायन्स व्यवसायांमध्ये होती, 13.3%. तसेच नॅचरल आणि अप्लाईड सायन्समधील टेक व्यवसायत देखील या क्वार्टरमध्ये 9.6% वाढ झाली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com