Job cuts : टेक कंपन्यांनंतर आता मीडिया क्षेत्रात नोकर कपात, पत्रकारांवर नोकरी जाण्याचं संकट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। दिग्गज टेक कंपन्यांमधील कपातीदरम्यान (Job cuts) जगभरातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील नोकऱ्या कमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. जागतिक आर्थिक मंदीच्या काळात, जाहिरातदारांनी खर्च कमी केला आहे. ज्यामुळे मीडिया उद्योगात नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे. Axios च्या मते, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत मीडिया उद्योगात 3 हजारहून अधिक नोकर्‍या कमी झाल्या असून आणखी कपात सुरुच आहे.

अनेक मीडिया आउटलेट्सने सुरु केली कपात (Job cuts)

वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीने मंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना काढून टाकणे सुरूच ठेवले आहे. सूत्रांनी एक्सिओसला दिलेल्या माहितीनुसार, CNN प्रमुख ख्रिस लिच यांनी गेल्या आठवड्यात कर्मचार्‍यांना इशारा दिला. पुढील महिन्यापासून नेटवर्कमध्ये अधिक कपात केली जाणार आहे. पॅरामाउंट ग्लोबल ते वॉल्ट डिस्ने कंपनीपर्यंत अनेक मीडिया आउटलेट्सने कपात सुरु केली आहे. यासोबतच नवी नियुक्ती थांबविणे आणि इतर खर्च कमी करण्याचे मार्ग अवलंबले आहेत.

2020 मध्ये Politico मधून लॉन्च केलेली टेक न्यूज वेबसाइट प्रोटोकॉल ही वर्षाच्या अखेरीस बंद होणार असल्याचे सांगितले. Axios च्या मते, यातून साधारण 60 टक्के कर्मचाऱ्यांना (Job cuts) कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला छोट्या कपातीनंतर 15 टक्क्यांपर्यंत खर्च कमी करण्याची त्यांची योजना असल्याचे व्हाईस मीडियाचे सीईओ नॅन्सी दुबक यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र उद्योगाला सर्वात जास्त वितरण आणि मजुरीच्या खर्चाचा भार सहन करावा लागत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यूएसए टुडे पॅरेंट कंपनी गॅनेटने सांगितले की, ऑगस्टमध्ये 400 लोकांना कामावरून काढून टाकल्यानंतर फर्लो व्यतिरिक्त (Job cuts) आणखी एका फेरीची योजना आखली आहे. क्रंचबेस न्यूज टॅलीनुसार, टेक उद्योगात, नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत यूएस टेक क्षेत्रात ७३ हजारहून अधिक कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. नेटफ्लिक्स (Netflix ) सारख्या मोठ्या टेक कंपन्यांनी देखील यावर्षी कर्मचारी कपात केली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com