Job Cuts : ‘ही’ कंपनी देणार 600 कर्मचाऱ्यांना डच्चू ; जगासोबत भारतात नोकर कपातीचं संकट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून जगभरातील (Job Cuts) अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ट्विटर, मेटा, फेसबुक, Amazon सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एका नोटीसवर कामावरून काढलं आहे. त्यात आता भारतीय कंपन्याही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका मोठ्या नामांकित कंपनीनं तब्बल 600 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे आणि तशी घोषणाही केली आहे.

हॉस्पिटॅलिटी चेन OYO ने शनिवारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या छाटणीची माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तिच्या एकूण 3700 कर्मचाऱ्यांपैकी ती 600 कर्मचाऱ्यांना कामावरून (Job Cuts) काढत आहे. नवीन कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. संस्थात्मक बदलांमुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एक अहवालानुसार OYO ने आपल्या टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्ट टीममधील या 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. प्रकल्प बंद पडल्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. इतर कर्मचाऱ्यांना अन्य संघात हलवण्यात आले आहे. कंपनीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की ती आपल्या विक्री संघासाठी सुमारे 250 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल.

काय आहे कंपनीचं म्हणणं

OYO कॉर्पोरेट ऑफिस आणि OYO व्हेकेशन होम्समधील उत्पादन आणि तंत्रज्ञान टीमचा आकार कमी करत आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ती तिच्या एकूण 3700 कर्मचारी संख्यापैकी 10% कर्मचारी कमी करेल, ज्यामध्ये 250 सदस्य आणि 600 कर्मचाऱ्यांची नवीन भरती (Job Cuts) केली जाईल.

ज्या टीमचे पायलट विकसित केले जात होते त्यांच्याकडून कंपनीतील टाळेबंदी देखील होत आहे. यामध्ये, अॅप गेमिंग, सामाजिक सामग्री क्युरेशन आणि पॅट्रिऑन-सुविधायुक्त सामग्रीवर काम करत होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही व्यवसायाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत नवीन कर्मचाऱ्यांचीही भरती करण्यात येणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com