करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Job Alert) आनंदाची बातमी आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर अंतर्गत वरिष्ठ निवासी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 39 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे.
संस्था – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर
भरले जाणारे पद – वरिष्ठ रहिवासी
पद संख्या – 39 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2024
वय मर्यादा – 45 वर्षे
अर्ज फी – रु.100/- (Job Alert)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ रहिवासी राष्ट्रीय/भारतीय अयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार व महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलची डी. एम. कार्डीओलॉजी, डी. एम. न्युरॉलॉजी, डी.एम. न्युओनेटॉलॉजी, एम.सी.एच. न्युरोसर्जरी, एम.सी.एच. युरोसर्जरी, पदवी कायम नोंदणी आवश्यक आहे
मिळणारे वेतन –
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ रहिवासी | रु. ७१००/- व इतर भत्ते असी एकुण रु. ६७८८१/-रु. ७४००/- व इतर भत्ते असी एकुण रु. ६९५६४/-रु. ७७००/- व इतर भत्ते असी एकुण रु. ७१२४७/ |
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 11 जुलै 2024
मुलाखतीची वेळ – दुपारी 03:30 वाजता
असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज आणि शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
1. PDF
2. PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.vdgmclatur.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com