Job Alert : राज्याच्या ‘या’ सहकारी बँकेत नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक (Job Alert) येथे कनिष्ठ अधिकारी, लिपीक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.

बँक – विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक
भरले जाणारे पद – कनिष्ठ अधिकारी, लिपीक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३

नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
वय मर्यादा –
कनिष्ठ अधिकारी – 40 वर्षे
लिपीक – 35 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/-
परीक्षा फी – (Job Alert)
रु. 1000/-
महिला/एससी/एसटी/एनटी/ओबीसी / यांचेकरीता – रु. 5००/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी
  • किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा)
  • बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थांमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव अत्यावश्यक
  • एम.बी.ए./जीडीसी अँड ए / जेआयआयबी/ सीएआयआयबी असल्यास प्राधान्य
  • संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक
लिपीक
  • किमान पदवीधारक (कोणत्याही शाखेचा)
  • बँका/पतसंस्था/इतर वित्तीय संस्थांमध्ये किमान ३ वर्षांचा अनुभव
  • जी.डी.सी अँड ए. उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य.
  • संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक

 

Job Alert

Job Alert

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या (Job Alert) अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अपूर्ण माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिकृत वेबसाईट – https://vishwasbank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com